Friday, 5 March 2010

मोनालिसा

जेव्हा विसरून गेली होतीस
तूच तुझे जगणे..
उगवणारा दिवस झाला होता जेव्हा
फ़क्त प्रकाशाच्या पाठशिवणीचा खेळ...
एक विचित्र झाकोळाने ग्रासलेले मन ..
तंद्रीतुन जागेपणीच्या कासावीस वेळा ..
स्वत: च्या अस्तित्वाचा शोध ...

आणि अश्यात एक हिरवे बीज तुझ्या मनात रुजले ..

त्याच्या केवळ अस्तित्वाने ...
तुला तुझे नेहेमीचे आनंदी गाणे आठवले...
तुझ्या शुष्क मनाला मिळाले गारव्याचे पाणी..

आणि आता तोच अंकुर ..

तुझे जागेपणी स्वप्न बनून
तुझ्या जिंकलेल्या मनाची गोष्ट सांगेल ..

मनातून डोकावतोच आहे ..

पण जसे बीजाचे अंकुरणे ,असते एक लढाई ..

एक मनाची मनाशीच ..
एक मातीशी .. हवेशी ..भोवताल अवकाशाशी .
मनाची कुंपणे तर केव्हाच ओलांडून आलीस ...
आता प्रश्न फ़क्त मातीच्या जोराचा ....

आणि हो माणसांच्या जगात ...

अजुन एक विरोधक असतो ...लोकापवादाचा ...
जो स्वत:च्या मर्यादांचे मुसळ डोळ्याआड़ लपवून ..
शोधत असतो दुसर्‍याचे अपयश ..
काहीना नसतेच स्वप्नांचे मोहरणे ठावुक ..
दगड मातीचीच मने घेवुन वावरत असतात काही ..

अश्या वेळी तुझेच अवीट गाने गात रहा ..
तुझ्या स्निग्ध मायेमधे गोंजार त्याचे अस्तित्व
ओंजळीच्या आडोशात जगवत रहा 'जीव'..

बीजाचा अंकुर होईल... अंकुराचे रोप ..

रोपाला कोवळी पालवी .. गर्द हिरवी पाने ..
मग कधीतरी ... तुझ्याच नकळत ...





हे सगळे होणे सहजच वाटावे
असे एक सुंदर फुल ...

तुझ्या मनाचा रंग असलेले ..

आठवणींचा गंध असलेले ...

आणि मग मोनालिसाच्या स्मिताहस्या सारखे ..

तुझ्या फुलण्याचे रहस्य शोधत राहतील वेड़े लोक ..





6 comments:

  1. Chan lihila ahes, ani vachun mi hi Monalisa sarakha nasala tari chan hasya kela.... Hope to see your kavitas back full flegde :-)

    ReplyDelete
  2. kavita khup aavadli.aaga pratekach manus phulat aastana tyala zagdavech lagte .malahi hasu aale monalisa sarkhe.
    aai{pahilya ccoment madhe he lihayche rahile}
    aani ho mansanchya jagat hya kadavyachi phod tuzya kadun spashtikaran have aahe.
    aai

    ReplyDelete
  3. aaj parat ekda kaslishi umed deun geli hi Kavita :) tonic aahe ka manache ;-?
    thanks :)
    -Prajakta

    ReplyDelete
  4. Kou.. tu hope karato ahes tar kharch karen ha kavita mag mala kahi mhanayche nahi :p hehe
    Aai .. swapna fulane .. ani tya sathi karavi laganarya kasarati hi pratekachich kahani ahe mhanun hi kavita pratekachich ahe :)
    Praj.. tu kasali god ahes.. evadhi avvvaaa mothi kavita sarakhi sarakhi vachates :)

    ReplyDelete
  5. sunder lihites.... :) aavadalech nahi fakt PATALE suddha..

    ReplyDelete
  6. Harshada .. Blogvr tujhe hardik swagat ani pratikriyesathi dhans :)

    ReplyDelete