Thursday, 25 February 2010

दुरितांचे तिमीर जाओ .....

१४ Feb २०१० .. पुण्यात बॉम्ब स्पॉट.... जगाच्या नकाशावरचा एक एक ठिपका कुठना कुठे रोज लाल होतो आहे.
आत्ता पर्यंत मुंबई, कश्मीर कुठे कुठे बॉम्ब स्पॉट होत होते... पण त्याच्या न्यूज़ पहाताना खूप हळहळणे .. त्या नंतर २-३ दिवस पेपर मधे Victims च्या सगळ्या स्टोरीस वाचून त्याना मनातल्या मनात त्यांच्या आत्म्याना चीर शांती मिळो अशी प्रार्थना करणे हे सगळे .. मनावर लहानपणा पासून झालेल्या संस्कारांमुळे घडत होते .. आणि मग त्या त्या शहरांचे spirit म्हणून news channel , पेपरवाले बासनात गुंडाळून ठेवायचे आणि सगळे सुरळीत पुढे चालू की ते कळवळणे मागे पडायचे..

पण परवाचा पुण्यात झालेला बॉम्ब स्पॉट .. म्हणजे जेव्हा घरापर्यंत आगीचे लोण पसरले तेव्हा मात्र खडबडून जाग आली... मुळातून हादरले मी.. रोज कुठे कुठे वाचून अर्थ गमावलेल्या 'दहशतवाद' या शब्दाचा खूप भयानक अर्थ मला त्या दिवशी कळला... नकळतपणे का होईना आपण किती स्वार्थी आहोत याची मनापासून लाज वाटली..
खूप विचार करूनही आपण यासाठी नेमके काय करू शकतो हे न कळूंन त्या पेक्षा काहीच करू शकत नाही हे कळून खुपच हतबल वाटले..

प्रश्न माहीत आहेत .. कारणे ही माहीत आहेत.... उत्तरेही माहीत आहेत.. पण ती प्रत्येक जण आपापली वेगळी शोधतो आहे आणि तोच प्रॉब्लेम आहे .. प्रत्येकाने आपल्या 'स्व' च्या भिंती घट्ट आणि मोठ्या बांधल्या आहेत की.. आणि मग सोसाइटी,गल्ली, गाव, राज्य , देश , खंड.... या कितीतरी भिंतीच्या झरोक्यांमधून माणसे एकमेकाना निरखत आहेत..

माणसाच्या मूलभूत गरजांचे प्रश्न एवढे तीव्र आहेत ... आणि प्रचंड सामाजिक विषमता .. कोणी ना कोणी तरी असंतूष्ट असणारच आहे.. आणि त्यांच्या गरजा जेव्हा पूर्ण होणार नाहीत ते लोक हातात शस्त्र घेऊन डोळ्यांवर् पट्ट्या चढवून वार करत राहतील... त्यामधे निरपराध लोक मरतील. त्यांचे आपले लोकही मरतील .. मग ज्यांचे कोणी सख्खे गेले .. ते अजुन त्वेषाने नवीन लढाई ची तयारी करतील..

दुष्टचक्र आहे हे..

हिंसेने आत्ता पर्यंत जगात कधीही आणि कुठलेही प्रश्ना सुटलेले नाहीत हा इतिहास सगळ्यांच ठाऊक आहे .. पण धर्माचा अर्थच न कळलेले आंधळे लोक आपल्या हातात सत्ता घेऊन स्वत: सोबत पूर्ण जगाचच नायनाट करायला निघाले आहेत.... आणि काहीच कोणाच्याच हातात नाही आहे....

'जगा आणि जगू द्या ..' ही साध्या जीव जंतू, कीटक या सर्वाना समझणारी गोस्ट प्रगत मेंदूच्या माणसाला कळू नये?

पण मग असेही वाटते losses are in comparable ...काहीही अपराध नसताना जीव गमावलेले आणि मग त्यांच्या घरच्यांच्या आयुष्यांची वाताहत ... कोणीतरी कायमचे गमावले आहे या मनस्तिथी मधे नसेल कसलेच भान राहत कोणाकोणाला ...
मग असे हात जो पहिले येऊन सावरतो तो जिंकतो... समाजशत्रु अश्या हातांच्या शोधत अहोरात्र असतात ..
ज्यानी गमावले ते ज्यांच्यामुळे गमावले ती कोणी व्यक्ती नव्हती... संघटना नव्हती.... ती एक वृत्ती आहे... जी मनातून जायला हवी..

राजकारण , सामाजिक स्तरावर् नेमके यासाठी साठी काय केले पाहिजे ते कळत नाही मला पण यासाठी मी मात्र रोज ज्ञानेश्वरांची 'विश्वशांती' ची प्रार्थना 'पसायदान' रोज न चुकता अळवणार आहे आणि सर्व काही पाहत असलेल्या देवाला सांगणार आहे

'दुरितांचे तिमीर जाओ... विश्व स्वधर्म सूर्ये पाहो .. जो जे वांछील ओ ते लाहो.. प्राणिजात.... '

जगाच्या नाशाची स्वप्न पाहणार्‍या अभागी जीवांच्या मनातले तिमीर दूर कर .. त्याना आपली शक्ति जगाच्या कल्याणा वापरण्याची बुद्धी दे...

ज्यानी गमावले आहे,ज्यांच्या उद्विग्न मनाला आधार दे.....
त्यांच्या आयुष्याला सावरण्याची ताकद दे...त्याना शस्त्र न उचलता हे दुष्टचक्र भेदण्याची प्रेरणा दे..

ॐ शांती: शांती: शांती: .....

2 comments:

  1. khup sundar lihile aahes :) prarthana khup samarpak aahe :) he sagla itaka hatabahercha aahe kuna ekatya mansachya ki thet devalach hi prarthana karavi lagnar aahe...aaplya avati bhavati jithe garaj asel tithe devdoot mhanun apan aahot ya bhavanene madat karne aaplya hatat nakkich aahe :)

    ReplyDelete
  2. Kharach... Aplyala vattah, jittey apan rahayla ahot ti ekdum surakshit jagah ahey, Pan Dahshadine ti tikkan pan atah shodun kadli ahey. Sagle ek houn yachya viruddhat ladney hey ek paryay urlay.
    Evdey apley veer jawan Border var taynat houn diwas ratra apli raksha kartayet. Apan pan satark houn hya dahshadvadyanah lesson shikwayla pahije.
    God really help those who help themselves. In this case, he will surely is there with the innocent.

    ReplyDelete