Monday, 1 February 2010

'Blog' वरचा ब्लॉग :)

||श्री||

खरे तर गेल्या ६ वर्षांपासून software च्या क्षेत्रात काम करणारी मी ब्लॉग या तमाम IT public च्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या क्षेत्रापासून कशी काय दूर राहिले देव जाणे!. अर्थात याचा मोठा वाटा माझ्या huge workload चा आहे ज्याने मला एवढी वर्षे सतत busy ठेवले आणि अर्थात माझ्यासारखे 'पटकन बहकणार्‍या' जमातीमधे हजारो लोक असणारच आहेत याची पूर्ण कल्पना असल्याने ब्लॉग नावाचे प्रकार कंपनी ने आम्हाला कळायच्या आधीच बंद करून ठेवलेले .. :(

पण ' आता जरा लईच काम झाले करून ... जा मेधा. थोड़े दिवस जीले अपनी जिंदगी..' असे देवाने सांगितले आणि माझ्या गोड नवर्‍याने चक्क मला ही london holiday gift केली.. :)

तर सध्या थोड़े दिवस मी 'Busy IT SW engg..' मधून चक्क 'House wife' च्या भूमिके मध्ये...
स्वयंपाकाचे अधिष्टान पार पडले की मी आपली चालले जगाच्या सफरीवर...

मग कधी छान वाचण्याजोगे .. कधी छान कविता .. लेखांच्या शोधत net वर वणवण भटकल्यावर काय काय मिळाले रस्त्यांमधे ... कोणी कोणी ते किती छान सजवून ठेवलेले आपापल्या Blogs मधे ... किती सारे सुंदर आणि नवे नवे ..या गंमत-गोड गोष्टीमधे माझ्यासारखी mad मुलगी अडकली नसती तरच नवल..


तर आता थोडेसे माझ्या उद्देशाविषयी... तशी
व्यक्त होणे ही माणसाची आदिमपणापासून मूलभूत प्रवृत्ति असावी.. माणसाला कधी बोलावेसे वाटते .. कधी कोणाचे ऐकावेसे वाटते.. तर कधी आपल्याला जे कधी मनातल्या मनातच काही बाही वाटत असते ते कधी कोणाला वाटले आहे हे कळल्यावर उगीचच अकारण छान ही वाटते...

कंप्यूटर बाबा समोर खड़खड़ाट करता करता मी हे व्यक्त होणे जराशी विसरल्या सारखीच...

नाही म्हणायला कामाच्या बरोबरीने चाललेल्या कितीतरी mails च्या शृंखला आहेत पण तरीही..

उगीचच व्यक्त होणे थोडेसे राहूनच गेलेले..

कधी सकाळच्या कोवळया उन्हात हसलेले काही office मधे पोचता पोचता विसरून गेलेले...


Meeting च्या मधूनच सुचलेले काही postpone केलेले..


Lines of code कॉपी करतानाचे काही मनाच्या clipboard वर राहून गेलेले..

ऑफिसहुन घरी जातानाच्या संध्या छाया घरी पोचेपर्यंत विरून गेलेल्या ...

रात्री निजतानाच्या चांदण्या झोपेतच विझून गेलेल्या..


Fast track वर चालता चालता आजुबाजुचे सुटलेले भान..


भोवताली 'का, कशासाठी , कधी पर्यंत...' प्रश्न पडलेले माणसांचे रान ...


बघू गवसते का यातले काही जे मागे सोडून आले ..

सापडते का काही जे हरवुनिया गेले ..


- मेधा

3 comments:

  1. waw Medha! you r back with your magic of words which we missed so long!

    ReplyDelete
  2. wow !! keep it up .

    ReplyDelete
  3. सुंदरच मांडलेस मनातले. अनेक शुभेच्छा! आता वारंवार भेटत राहूच.:)

    ReplyDelete