१४ Feb २०१० .. पुण्यात बॉम्ब स्पॉट.... जगाच्या नकाशावरचा एक एक ठिपका कुठना कुठे रोज लाल होतो आहे.
आत्ता पर्यंत मुंबई, कश्मीर कुठे कुठे बॉम्ब स्पॉट होत होते... पण त्याच्या न्यूज़ पहाताना खूप हळहळणे .. त्या नंतर २-३ दिवस पेपर मधे Victims च्या सगळ्या स्टोरीस वाचून त्याना मनातल्या मनात त्यांच्या आत्म्याना चीर शांती मिळो अशी प्रार्थना करणे हे सगळे .. मनावर लहानपणा पासून झालेल्या संस्कारांमुळे घडत होते .. आणि मग त्या त्या शहरांचे spirit म्हणून news channel , पेपरवाले बासनात गुंडाळून ठेवायचे आणि सगळे सुरळीत पुढे चालू की ते कळवळणे मागे पडायचे..
पण परवाचा पुण्यात झालेला बॉम्ब स्पॉट .. म्हणजे जेव्हा घरापर्यंत आगीचे लोण पसरले तेव्हा मात्र खडबडून जाग आली... मुळातून हादरले मी.. रोज कुठे कुठे वाचून अर्थ गमावलेल्या 'दहशतवाद' या शब्दाचा खूप भयानक अर्थ मला त्या दिवशी कळला... नकळतपणे का होईना आपण किती स्वार्थी आहोत याची मनापासून लाज वाटली..
खूप विचार करूनही आपण यासाठी नेमके काय करू शकतो हे न कळूंन त्या पेक्षा काहीच करू शकत नाही हे कळून खुपच हतबल वाटले..
प्रश्न माहीत आहेत .. कारणे ही माहीत आहेत.... उत्तरेही माहीत आहेत.. पण ती प्रत्येक जण आपापली वेगळी शोधतो आहे आणि तोच प्रॉब्लेम आहे .. प्रत्येकाने आपल्या 'स्व' च्या भिंती घट्ट आणि मोठ्या बांधल्या आहेत की.. आणि मग सोसाइटी,गल्ली, गाव, राज्य , देश , खंड.... या कितीतरी भिंतीच्या झरोक्यांमधून माणसे एकमेकाना निरखत आहेत..
माणसाच्या मूलभूत गरजांचे प्रश्न एवढे तीव्र आहेत ... आणि प्रचंड सामाजिक विषमता .. कोणी ना कोणी तरी असंतूष्ट असणारच आहे.. आणि त्यांच्या गरजा जेव्हा पूर्ण होणार नाहीत ते लोक हातात शस्त्र घेऊन डोळ्यांवर् पट्ट्या चढवून वार करत राहतील... त्यामधे निरपराध लोक मरतील. त्यांचे आपले लोकही मरतील .. मग ज्यांचे कोणी सख्खे गेले .. ते अजुन त्वेषाने नवीन लढाई ची तयारी करतील..
दुष्टचक्र आहे हे..
हिंसेने आत्ता पर्यंत जगात कधीही आणि कुठलेही प्रश्ना सुटलेले नाहीत हा इतिहास सगळ्यांच ठाऊक आहे .. पण धर्माचा अर्थच न कळलेले आंधळे लोक आपल्या हातात सत्ता घेऊन स्वत: सोबत पूर्ण जगाचच नायनाट करायला निघाले आहेत.... आणि काहीच कोणाच्याच हातात नाही आहे....
'जगा आणि जगू द्या ..' ही साध्या जीव जंतू, कीटक या सर्वाना समझणारी गोस्ट प्रगत मेंदूच्या माणसाला कळू नये?
पण मग असेही वाटते losses are in comparable ...काहीही अपराध नसताना जीव गमावलेले आणि मग त्यांच्या घरच्यांच्या आयुष्यांची वाताहत ... कोणीतरी कायमचे गमावले आहे या मनस्तिथी मधे नसेल कसलेच भान राहत कोणाकोणाला ...
मग असे हात जो पहिले येऊन सावरतो तो जिंकतो... समाजशत्रु अश्या हातांच्या शोधत अहोरात्र असतात ..
ज्यानी गमावले ते ज्यांच्यामुळे गमावले ती कोणी व्यक्ती नव्हती... संघटना नव्हती.... ती एक वृत्ती आहे... जी मनातून जायला हवी..
राजकारण , सामाजिक स्तरावर् नेमके यासाठी साठी काय केले पाहिजे ते कळत नाही मला पण यासाठी मी मात्र रोज ज्ञानेश्वरांची 'विश्वशांती' ची प्रार्थना 'पसायदान' रोज न चुकता अळवणार आहे आणि सर्व काही पाहत असलेल्या देवाला सांगणार आहे
'दुरितांचे तिमीर जाओ... विश्व स्वधर्म सूर्ये पाहो .. जो जे वांछील ओ ते लाहो.. प्राणिजात.... '
जगाच्या नाशाची स्वप्न पाहणार्या अभागी जीवांच्या मनातले तिमीर दूर कर .. त्याना आपली शक्ति जगाच्या कल्याणा वापरण्याची बुद्धी दे...
ज्यानी गमावले आहे,ज्यांच्या उद्विग्न मनाला आधार दे.....
त्यांच्या आयुष्याला सावरण्याची ताकद दे...त्याना शस्त्र न उचलता हे दुष्टचक्र भेदण्याची प्रेरणा दे..
ॐ शांती: शांती: शांती: .....
Thursday, 25 February 2010
Monday, 8 February 2010
मनातले हरितद्रव्य आणि मायदेशीचा सूर्य ....
अस्वस्थ होण्याच्या असोशीने त्याची इतकी मी कधी वाट पाहीन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते..
तशी फक्त सूर्योदय पाहण्याच्या ओढीने मी , मीटू मीटू म्हणणार्या डोळ्याना उठवून ... 'Moment of inertia' प्यायलेल्या शरीराला जोर देत कित्येकदा ६:30 च्या बस ने ऑफीस ला पळवलेले आहे...
पण सकाळचे त्याचे कोवळे सोनेरीपण ओसरले की अंगाची काहीली करणार्या उष्ण झळा मला तमाम एस्किमो लोकांचा हेवा करायला लावायच्या ...
Glucon-D च्या जाहिरातीतले त्याचे केलेले कार्टून मुलांच्या मधली शक्ती 'शूर्प शूर्प' करत स्ट्रॉ ने प्यायचे ते अगदी अगदी खरे वाटायचे....
पण इथे मी गेले 2-3 दिवस त्याच्या ओझरत्या एका दर्शनाला तरसले आहे .. त्याने यावे आणि 2 mins का होईना अवकाशाचा पट उजळून टाकावा आणि मनामनात थंडीने थिजलेले 'बाष्पपण'...
'देशाबाहेर.' अशी मी तिसर्यांदा .... मागच्या दोन्ही वेळा मी अशीच थंडीच्या मौसमातच बाहेर आलेली..
पण पहिल्या वेळी हवामान , परदेश, खाणे ,मित्रा मैत्रिणी, जागा... यांच्या कासावीस करणार्या आठवणी न येता ... सारे गोड गोडच वाटावे ..अशी मायेची पाखरण करणारी माझी जीवाभावाची मैत्रीण अपर्णा होती सोबतीला.. आणि नव्या नवलाईचे 'फॉरिन चे दिवस' संपायच्या आतच मी परतलेली..
दुसर्या वेळी एकटेपणाची आठवण ही होऊ नये एवढे 'अबब!!!! काम'... आणि कधीमधी ते डोकावलेच तर.. माझ्या स्वप्न रंजक मनाला ... अनोख्या snow चा केवढा तरी आधार...
तशी लहानपणापासूनच मी 'खिडकी प्रेमी'... घरामधे ..बस मधे... ऑफीस मधे कुठ-कुठल्या झरपा शोधून काढून बाहरेचे वातावरण प्यायची अंगभूत सवय..
इथे आले आणि दुसर्या दिवशी खिडकीतून डोकवून बाहेर पहिले.. तर माझे आवडते 'धुंद कुन्द वातावरण..'
मी मनातल्या मनात खुश... एरवी असे वातावरण दिसले की माझे मन तडक 'धुक्यात लपलेला सिंहगड' चढू लागलेले असते ....
मनाच्या दुसर्या कोपर्यात … जुन्या पावसाच्या आठवणी आधीच कोसळू लागलेल्या असतात….
मनात सिंहगड चे सहस्त्रवर्तन करून झाले तरी.. लॅपटॉपवर पावसाची गाणीही गाऊन झाली ... काहीतरी चुकतय... काहीतरी हुकतेय
एक हुरहुर वाटणारी जाणीव.. थंडीने बंद खिडक्या... त्यामुळे असेल कदाचित ..आता नवाच देश म्हटल्यावर म्हणून वाटत असेल असे म्हणून सोडून द्यावे तर तेही जमेना....
आणि मग एका सकाळी तो दिसला... आमच्या 6 व्या मजल्यावरच्या स्वयंपाक घरच्या खिडकीतून दूरवर च्या क्षितिज रेषेला ..लालभडक रक्तिमा घेऊन तो अवतरला ..
त्या मंद लालसर तेजाने .. आणि एका ओळखीच्या अनुभूतिने डोळेच दिपाले... ओळखीचे हसू घेऊन मग तो दिवसभरच राहिला सोबतीला.. आणि रोजच्याच कामामधे एक उगीचच उत्साह भरून राहिल्या सारखा...
दिवस भर प्रकाश पीत... शेवटी 4:30 तो जेव्हा पश्चिमेचे रंग उधळत अस्ताला जाऊ लागला..
तेव्हा एक विचित्र हूरहुर दाटून आली मनात... एखाद्या जिवलग मित्राला द्यावा तितक्या उत्कटतेने त्याचे ते रूप डोळ्यात साठवत राहीले .
'मग. आता कधी दर्शन…?’
तो मिश्किल हसला आणि क्षितिजापल्याड दिसेनासा झाला..
आणि खरोखरीच सलील च्या 'दूर देशी गेलेल्या बाबा...' सारखाच तो दूर राहिलेल्या माझ्या देशात उगवत राहिला..
रोजच्या घरच्या फोन्स मधून मी त्याची चौकशी करायचेच.. त्या पेक्षा .. इथे तो नाहीच आला आज... असेच सांगत राहायचे...
घरच्याना इथे असणार्या थंडीचे tension .. ‘आज नाहीच का आला म्हणजे थंडी असेल ना ? ‘ थंडी पेक्षा काहीतरी एक बोचरे मनाला सलते ..ते कुठल्याही शब्दात व्यक्त न होणारे…
आणि एक दिवस रात्रभर पडलेल्या 'स्नो'ला उजळवायला तो आला..
मागच्या खेपेसारखा अवचित.. अचानक
आधीच 'स्नो ..' पाहून हरखलेली मी .... या अनुभवात तोही शामिल म्हणून अजुनच समाधानी...
'पण आज थोडा वेळच राहा हा.. स्नो हवाय मला…’ म्हटलेले त्याने लगेच ऐकले असावे….
त्या नंतर तो कधी मधी संध्याकळीच उगवायचा ढगांमधून…. आणि मग ‘कुक्कडिकुक्क...’ म्हणत वेडावाल्यासारखा….5 mins च्या आत गायब….
लपाछपी आणि पाठशिवणीच्या खेळात तो एकदम पटाईत.. सूर्य या देशांमधे जरा वेड्या सारखाच वागतो .
जसजसे आपण उत्तरेला जातो तसतसा सूर्योदय खूप उशिरा होतो.. वाचलेले प्रत्यक्ष्यात एवढे 'चिवित्र' असेल याची मला सूतराम कल्पना नव्हती .. Iceland च्या trip ला जाताना कौशल म्हणाला होता तिथे जरा उशिराच होतो हा सूर्योदय..
तिथल्या एका tour साठी आम्ही 8:30 च्या मिट्ट काळोखात बाहेर पडलेलो.. पण घड्याळ 10:30 दाखवू लागले आणि कुठेच त्याचा मगमूस दिसेना..
मला एकदा जत्रेत हरवल्यावर बाबा सापडेनात तेव्हा आलेले रडू परत फुटू लागलेले.. मनात म्हटले ‘लंडन सारखे दिसू नकोस हवे तर पण इथे सकाळ आहे असे तरी वाटू दे .' पण तो कुठचा ऐकायला.. 11च्या आसपास आरामात साहेब आपल्या सोनेरी रंगांचा पंखा घेऊन हजर.. छोट्या मोठ्या डोंगेरामधे लपत छपत ..ओळखीचे तेच हसू पुन्हा खेळवत..
तिथे दिसलेले त्याचे सुंदर रूप कधीच न पाहिलेले.. 'सब्र का फल' मिठाच काय अमृताच्या चवीचे …
तर अशा त्याच्या नाना तर्हा आता माझ्या सवयीच्या झाल्या आहेत….त्याचा हा लपाछपी चा खेळ थोडासा परिचित झालाय… रोज सकाळी आकाश पाहून आज तो येणार की नाही याचे अंदाजही थोडेबहूत बरोबर येऊ लागलेत…
माझ्या एका मित्राला एकदा एक 90 वर्षाचे अमेरिकन आजोबा भेटालेले विमानात… ‘इंडिया मधून ’ आलो आहोत आपण असे त्याने सांगितल्यावर .. त्याचा हेवा करणार्या नजरेने ते त्याला म्हणलेले…. ‘ 'You are from county of sun .. and where there is sun people are open minded and talkative ’.. how true …. भारतीयांच्या मोकळे पणाचे हेच तर मर्म नसेल…. We are really blessed ...
लोक दिवस सुरु झाल्या क्षणा पासून बाहेर पडून एकमेकांशी बोलतात .. हसतात… याचे कारण आपल्या इथे सदोदित प्रकाश देणारा आणि दिवसाच्या किमान १०-१२ तास अवकशात असलेला सूर्य आहे… त्याचे आपल्या प्रत्येक बाबतीतले डोकवलेपण आपण किती गृहीत धरलेले असते…
दिवस असला की तो असणार हे श्वासा इतके आपल्या अंगवळणी पडलेले असते ...
सरी मधून उमटाणारे इन्द्र्धनुश्यी रूप किती मनोहरी.. थेंबांचे सोनेरी मोती किती स्वर्गीय .
थंडीमधे धुक्या मधून त्याने पसरलेले सहस्त्र रश्मी बाहू किती लोभस आणि उबदार..
आजूबाजूच्या माणसां व्यतिरिक किती दुर्लक्षित राहणार्या गोष्टींचे गुलाम असतो आपण... किती सारी सुष्ट्री तत्वे आपल्याच नकळत आपल्या शरीरामधे भिनून राहिलेली असतात....
झाडांच्या पानांना हरित्द्रव्य तयार करण्यासाठी जितकी सूर्यप्रकाशाची गरज तितकीच ती आपल्या मनालाही असावी…. नाहीतर माउस click वर जग उभे असण्याच्या जमान्यात … 'Stay Connected' ची सारी माध्यमे हाताशी असताना .. घराच्या अंगणातल्या जाई-जुई च्या गंधा इतकी .. त्या सोनेरी प्रकाश स्पर्शाला एवढे नसते ना miss करत मी..

Labels:
काही जाणीवा.. काही नेणीवा..
Monday, 1 February 2010
'Blog' वरचा ब्लॉग :)
||श्री||
खरे तर गेल्या ६ वर्षांपासून software च्या क्षेत्रात काम करणारी मी ब्लॉग या तमाम IT public च्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या क्षेत्रापासून कशी काय दूर राहिले देव जाणे!. अर्थात याचा मोठा वाटा माझ्या huge workload चा आहे ज्याने मला एवढी वर्षे सतत busy ठेवले आणि अर्थात माझ्यासारखे 'पटकन बहकणार्या' जमातीमधे हजारो लोक असणारच आहेत याची पूर्ण कल्पना असल्याने ब्लॉग नावाचे प्रकार कंपनी ने आम्हाला कळायच्या आधीच बंद करून ठेवलेले .. :(पण ' आता जरा लईच काम झाले करून ... जा मेधा. थोड़े दिवस जीले अपनी जिंदगी..' असे देवाने सांगितले आणि माझ्या गोड नवर्याने चक्क मला ही london holiday gift केली.. :)
तर सध्या थोड़े दिवस मी 'Busy IT SW engg..' मधून चक्क 'House wife' च्या भूमिके मध्ये... स्वयंपाकाचे अधिष्टान पार पडले की मी आपली चालले जगाच्या सफरीवर...
मग कधी छान वाचण्याजोगे .. कधी छान कविता .. लेखांच्या शोधत net वर वणवण भटकल्यावर काय काय मिळाले रस्त्यांमधे ... कोणी कोणी ते किती छान सजवून ठेवलेले आपापल्या Blogs मधे ... किती सारे सुंदर आणि नवे नवे ..या गंमत-गोड गोष्टीमधे माझ्यासारखी mad मुलगी अडकली नसती तरच नवल..
तर आता थोडेसे माझ्या उद्देशाविषयी... तशी व्यक्त होणे ही माणसाची आदिमपणापासून मूलभूत प्रवृत्ति असावी.. माणसाला कधी बोलावेसे वाटते .. कधी कोणाचे ऐकावेसे वाटते.. तर कधी आपल्याला जे कधी मनातल्या मनातच काही बाही वाटत असते ते कधी कोणाला वाटले आहे हे कळल्यावर उगीचच अकारण छान ही वाटते...
कंप्यूटर बाबा समोर खड़खड़ाट करता करता मी हे व्यक्त होणे जराशी विसरल्या सारखीच...
नाही म्हणायला कामाच्या बरोबरीने चाललेल्या कितीतरी mails च्या शृंखला आहेत पण तरीही..
उगीचच व्यक्त होणे थोडेसे राहूनच गेलेले..
कधी सकाळच्या कोवळया उन्हात हसलेले काही office मधे पोचता पोचता विसरून गेलेले...
Meeting च्या मधूनच सुचलेले काही postpone केलेले..
Lines of code कॉपी करतानाचे काही मनाच्या clipboard वर राहून गेलेले..
ऑफिसहुन घरी जातानाच्या संध्या छाया घरी पोचेपर्यंत विरून गेलेल्या ...
रात्री निजतानाच्या चांदण्या झोपेतच विझून गेलेल्या..
Fast track वर चालता चालता आजुबाजुचे सुटलेले भान..
भोवताली 'का, कशासाठी , कधी पर्यंत...' प्रश्न पडलेले माणसांचे रान ...
बघू गवसते का यातले काही जे मागे सोडून आले ..
सापडते का काही जे हरवुनिया गेले ..
- मेधा
Subscribe to:
Comments (Atom)