काल शाळेतल्या एका मित्राशी बोलत होते.. शाळेत जरी ’कधी बाई संपणार शाळा आणि मोठे होवू’ असे व्याकूळतेने (:)) वाटत असते तरी नंतरच्या आयुष्यात कळत जाते की तेच सर्वात सुंदर दिवस असतात.. त्या निरागस वयात जग-बिग प्रकार छोटा असतो.. आणि म्हणूनच कदाचित आनंदाच्या वाटा लवकर सापडत असाव्यात.. :)
शाळेच्या आठवणींमधे भिंगरु शकतेच गरगर .. पण त्या निमित्ताने एक ’परिसस्पर्श’ गोष्ट.आठवली ती पहिले लिहिते...
तर माझा हा शाळा-मित्र ’राहुल’ आणि मी भाषणे ठोकण्यात एकदम पटाईत होतो.

’स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच..’ ,
’मी शेंगा खाल्या नाहीत .... मी टरफले उचलणार नाही ’..
अशी लोकमान्य टिळकांची भाषणे शिरा ताणून ताणून म्हणायचो.. :) थोरामोठ्यांच्या अश्या टरफला-बिरफलांच्या आणि लहानपणाच्या गोष्टी कितपत खर्या-खोटया किंव्हा त्यांच्या चाहत्यांनी आपल्या भक्तीनुसार त्या सजवल्यात या वादात मी आता पडत नाही.. कारण या सुंदर आणि संस्कारी गोष्टींनी नेहेमीच आपल्या सर्वांच्या मनाच्या जडण-घडणीमधे हातभार लावलेला असतो.. तर त्यातल्याच एका भाषणातली ही छोटीशी पण सुंदर गोष्ट.. मनात झिरपलेली आणि मग कुठे कुठे उमटत राहिलेली..
एकदा शाळेत गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला
’आभाळ पडले तर तुम्ही काय कराल?’
एक मुलगा म्हणाला ’आभाळ पडले तर मी टेबलाखाली लपेन’
दुसरा मुलगा म्हणाला ’आभाळ पडले तर मी बाजेखाली लपेन’
तिसरा मुलगा म्हणाला ’आभाळ पडले तर मी आईच्या पाठीमागे लपेन’
एक मुलगा मात्र गोड हसत म्हणाला ’आभाळ पडले तर ... मी चांदण्या वेचेन ..’
आणि त्या मुलाचे नाव होते ’बाळ गंगाधर टिळक’..

मला नेहेमी शेजारची सीमाताई भाषणे लिहून द्यायची... एका वर्षीच्या भाषणामधे तिने ही गोष्ट सांगितली मला .. गोष्ट सांगतानाच तिचा चेहेरा चांदण्यांनी फ़ुललेला होता.. चांदण्या वेचण्याच्या कल्पनेने विलक्षण हरखून गेल्याचा क्षण अजून मनात ताजा आहे..ही गोष्ट सांगताना ....’मी चांदण्या वेचेन’ हे वाक्य उच्चारताना मला मीच दिसायचे.. (एरवी वेड्याबिद्र्या मुलांच्या पंगतीमधे अग्रपुजेचा मान माझा असला तरी कुठलीही गोष्ट ऐकताना त्या-त्या गोष्टींमधल्या शहाण्या बाळाचा रोल मात्रा माझाच असायचा बर का :) )..
बाकीचे लोक सैरावैरा धावताहेत... बकुळीच्या झाडाखाली वरुन हलकेच खाली येणारी फ़ूले वेचतात तशी आभाळातून हलकेच रिमझिमत येणार्या खूप सार्या चमचम चांदण्या माझ्या फ़्रॉकच्या ओच्यामध्ये ओघळताहेत... त्या संभाळत जमिनीवर पडणार्या चांदण्याही मी उचलते आहे.. आणि या अद्भुत कणांनी माझे शरीरच प्रकाशमान झाले आहे... एक विलक्षण अनुभुतीच देवून गेली ती गोष्ट मला...कुठल्याही परिस्थिती मध्ये सकारात्मक राहण्याचा आणि आयुष्यातली प्रत्येक गोष्टीकडे काव्यात्मक द्रुष्टीने पहाण्याचा सुंदर संस्कार या गोष्टीने केला..
याच दरम्यान मग कधीतरी भित्र्या ससोबाची गोष्ट पण कुठुनशी कळली.. एक ससुल्या असतो...त्याच्या पाठीवर काहिसे पडते...आणि तेव्हाच ढगांचा मोठा आवाज होतो त्याला वाटते आभाळच पडले आणि तो जीव मुठीत घेवून धावत सुटतो..वाटेत त्याला कोण कोण प्राणी भेटतात .. त्यांनाही तो सांगतो की ’आभाळ पडले पळा.पळा’. ते पण त्याच्या सोबत घाबरुन धावत सुटतात.. यामधे जंगलचे राजे सिंहमहाराज पण असतात बरं का..
मग त्यांना वाटेत धुर्त कोल्होबा भेटतो..तो मात्र त्याला थांबवून विचारतो ’अरे, कुठे आहे आभाळ?’
ससोबा म्हणतो ’हे काय माझ्या पाठीवर’..
कोल्होबा हसत सुटतो आणि म्हणतो..’अरे वेड्या हे तर पान आहे..’

या गोष्टीचे तात्पर्य समझण्याचे अर्थात वयच नव्हते पण मी मात्र तेव्हा ठरवले होते..
भेटला ना कुठे ससुल्या तर सांगयचे त्याला ..

’अरे वेड्या .. आभाळ-बिभाळ पडत नसतं काही कधीच.. आणि खरचं पडलंच तर मज्जाच असते. चमचम चांदण्या वेचता येतात..’
पुढे मात्र शाळा,अकरावी-बारावी ,इंजिनीअरिंग च्या धबडग्यात चांदण्यांची गोष्ट थोडीशी मागेच पडली .. अभ्यास, परिक्षा, स्पर्धा यातून धावताना माझाच काही खुट्ट झाले की दचकणारा ससुल्या झाला ... चांदण्या सोडून सारखे डोळ्यांसमोर काजवेच चमकायला लागले.. प्रोबलेम्सकडे पहाण्याचा प्राक्टिकल अप्रोच असला पाहिजे असे मनावर बिंबत गेले.. प्रश्न सुटत होते .. प्रोब्लेम्स सोल्व होत होते...पण काहीतरी चुकत होतच ..काहीतरी हुकत होत.. आणि त्यांच्याशी झटापटीमधे उमटलेले ओरखडे शमवायला चांदण्या तगत नव्हत्या... जमिनीवर पडुन मातीमधे मिसळायला लागल्या होत्या त्या... मग कधीतरी त्या भेटेनाश्याच झाल्या...उगीच बाबा मोठे होतो ना आपण :(
मग जॉब लागला .. पहिले लाडाकोडाचे ट्रेनिंगचे महिने संपले.. पहिल्या प्रोजेक्ट मध्येही नव्या सुनेला जसे चुडा उतरेपर्यंत घरचे काम नसते तसे क्युट-क्युट काम होते.. पण मग ओसरले की नव्या नवलाईचे दिवस.. मोठ्ठा आ वासून एक डेवलपमेंट प्रोजेक्ट चालून आला. माझ्या सौफ़्ट्वेअर क्षेत्रातले सवंगडी आपापला पहिल्या डेवलेपमेंट प्रोजेक्ट चा अनुभव नक्कीच रेलेट करु शकतील..

माझा प्रवास ’क्या करनेका वोहिच पता नाही’ इथुन सुरु झाला.. आणि का कोण जाणे (कारणे माहित असली तरी जर ती बदलता येणार नसतील तर असेच म्हणयचे असते.. :() प्रत्येक डेवलेपमेंट प्रोजेक्टचे एस्टिमेटस चुकलेलेच असतात .. आणि ते नेक्स्ट प्रोजेक्टमधे नीट होणारच असतात..फ़क्त तो ’नेक्स्ट’ ’उद्या’एतकाच लांब असतो..:(
तर आम्ही नवे, प्रोजेक्ट नवा, अंदाज चुकलेले, ’इस टाईम करना तो पडेगा नेक्स्ट टाईम पक्का देखते है’ म्हणत आपला लॅपटॉप बगेत कोंबत अगदी वेळेत घरी निघणारा मॅनेजर, प्रचंड काम ..(मला माहिती आहे.. घरोघरी मातिच्या चुली.. म्हणून परिस्थिती-वर्णन इथेच थांबवते :))
सलग स्लॉगिंग करुन वेडेच झालेलो आम्ही... त्यात माझा पडला ’दिलेले काम केलेच पाहिजे नाहीतर पाप लागते..’ वाला स्वभाव.. सक्काळी येवून ८:३० ला काम सुरु करायचे. ते फ़क्त लंच ब्रेक घ्यायचे.. बाकी सगळे ’अळिमिळी गुप चळी’ ..एकदम ’सुमडी’ मधे काम..
’काय काम आज केले त्यापेक्षा . बापरे हे आज नाही झाले तर’ भयगंडाने पछाडलेले असायचे मी ..ब्रेक शिवाय काम केले तर ते सगळे आज संपणारच आहे. अशी माझी भाबडी आशा असायची तेव्हा :) एकदम इन्नोसंट वॉरिअर होते मी..
क्युबिकल आणि प्रोजेक्ट मधले लोक त्या बिकट परिस्थितही जोक-बिक करायचे.. मी फ़क्त हसुन त्यामधे साथ द्यायचे... ते लोक आपापली दु:खे कौफी ब्रेकस मधे सांगुन हलकी करायची.. मीही सगळे करणारच होते .. फ़क्त काम संपल्यावर.. अर्थात काम कधी संपते का ? :)
मी तशी शांत स्वभावाची आहे आहे ...म्हणजे खूप बडबडी नाही ..(घरचे या वाक्यावर खूप हसतील:)) .. आणि तसे असले तरी आजुबाजूच्या जगात नेहेमीच सजग सहभाग असतो माझा...अक्टिव लिसनर आणि लागेल तिथेच बोलते मी.. पण त्या वेळी सगळंच बिनसलेले... जीव,शरीर,मन रोजच्या कामच्या ओझ्याने आंबून गेलेले असायचे..सगळ्या जगात आम्हालाच का काम... तंद्रीतच असायचे मी ...मला बोलता बिलता येते हे माझ्या क्युबिकलच्या लोकांनाही माहितच नव्ह्ते तर बाकिच्या प्रोजेट्च्या लोकांना कुठुन ठावूक असणार.
तशीच एक तांबरलेली वेळ...एप्रिल-मे असावा..एका इशुने संध्याकाळपासून जीव खाल्लेला माझा...त्याची सोडवणूकीची वाट माझी घरची वाट होती..
सगळ्यांचे तारवटलेले डोळे.. की-बोर्ड चे खाडखाड आवाज आणि.. सार्वत्रिक-सामईक संभाषणॆ

’श्यट.. फ़िरसे फ़ट गया...ये कोड है या भूत’
’वो डिफ़ेक्ट तो फ़िक्स हो गया पर ये क्या नया नाटक है अब..’
’ऒह .. गॉड.. ये एरर का सोल्यूशन तो मायक्रोसौफ़्ट के पासभी नही है..’
’य़ार.. एम-क्यु फ़िरसे रीस्टार्ट करना पडेगा..’
’अब्बे ये क्या डेटा भेजा है..भंकस.. ठीकसे भेज ..’
’हे भगवान.. विझ्युअल स्य़ुडियो क्रश हुवा.. पता नही चेंजेस सेव भी हुवे है या नही..’
’अब्बे कबसे कौस्टंट फ़ाईल लेके बैठा है .. जल्दी चेक इन मार...’
आणि मग अचानक सगळेच कडाडले....
’अरे यार... एसी बंद..लगता है ९ बज गये .....’ :(
अश्या वेळी सगळ्यांच्या सहनशक्तीचा एकदम कडेलोटच ..
’अरे मजे नही कर रहे बाबा कंपनीकाही काम कर रहे है ना..’
’ये प्रोजेक्टके बाद स्विच मार रही हु मै तो..’
’औटोमेटेड करना चाहिये यार..एसी बंद के फॅन चालु..’
तरी नशीब फॅन तरी होते.... मग माझ्या क्युबिकलवाला एक मुलगा ,चिराग उठला.. आणि तिरमिरित अख्ख्या फ़्लोअर चे फॅन चालू करून आला..
सगळ्या फॅनसची गरगर एकदमच अंगावर यायला लागली
कोणीतरी म्हणाले
’अरे ईतने स्पीडपे मत चला ..फॅन गिर जायेगा बे..’
चावी फ़िरवल्यासारखे बाकीचे कोण कोण म्हणत राहिले
’अरे बाबा नई बिल्डींग है.. मुझे लगता है फ़ैन क्या पुरी सिलिंग ही नीचे आयेगी...
’मजा आयेगा फ़िर डायरेक्ट आसमा के निचे...’
कोणी शंकेखोर मुलगा उगीच हसू न येणारा पीजे मारायच्या प्रयत्नामधे म्हणाला
’अब्बे फ़िर आसमाही गिरा तो..’
’कुछ भी.......’
’अभी पका मत रे..’
’अरे आसमा गिरा तो क्या हुवा..फ़िर सब मिलके स्टार्स कलेक्ट करेंगे नं..’
माझ्याच नकळत टिचकी वाजवत मी बोलून गेले...एका क्षणात फ़्रॉकच्या ओच्या मधे चांदणे वेचणारी शाळकरी मुलगी झाले की मी.. एक ’आनंद अनूभुती’ अंगभर पसरली....
'अल्ट + कंट्रोल + डीलीट' कळा बडवून उठलेच मी.. एक सुंदर स्मितहास्य करुन निघाले..
माझ्या वाक्या सरशी आणि अचानक देहबोलीमधे झालेल्या बदलामूळे सगळे लोक जरा बावचळलेच होते....
’आयला सही है रे तु.. ’
’हे गुड सेन्स ओफ़ ह्युमर हं..’
’ओह गॉड फ़िरसे वो बोलेगा... किसने कितने-कितने स्टार्स कलेक्ट किये है बोलो...हाहाहा’
’अरे य़ॆ बोलती भी है..’
असे काय काय संमिश्र पाठीवर आदळत राहिले...:)
माझ्या क्युबिकल ते वॉटर कुलरकडे जायच्या वाटेवर जवळ एक टेरेस होते...रोज पाण्याची बाटली भरताना भुलवायचे मला...
’आपले काम संपले की जायचेच हं राजा..’ रोज मनाला जोजवायचे माझ्या..
तडक दार उघडून बाहेर गेले..पौर्णिमेच्या अलिकडचीच कुठलीशी रात्र असावी ती...
ढगात लपलेला चंद्र सामोरा आला.. आणि प्रत्येक नजरेसरशी एक एक करत चमचमती चांदणी ..
आपणही या सुंदर पसार्याचा एक अविभाज्य भाग आहोत.. ही भावना पेशी-पेशीत शिरली...
अनिमीष नेत्रांनी आभाळ अधाशासारखी पित राहिले मी..
अनावर त्तृप्तिने डोळे मिटले..
चांदण्यांच्या हसण्याचा मंजुळ आवाज पहिल्यांदाच ऐकु आला तेव्हा..
खोल श्वास घेतला भरभरुन....हलकेच डोळे उघडून ...ओढणी पसरुन उभी राहिले..
मनातला ससुल्या टुणकन उडी मारुन बाहेर पडला...लॉनवर जावून बागडायला लागला.
आणि डोळे थेंब थेंब चांदणे होवून झोळीत ठिबकत राहिले मग ....:)
अजुनही बागरलेला (बावरलेला + घाबरलेला : शब्दजनक इति कौशल) ससुल्या भेटतो कधी कधी ..
कधी माझ्या मनातलाच..कधी माझ्या भावंडांमधे..कधी मित्र-मैत्रिणींमधे..
कधी जुनिअर्स मधे भेटत राहतो ... त्याला मग कुरवाळते आणि एवढेच सांगते..

’आभाळ-बिभाळ पडतच असतं रे... सारखंच इथे-तिथे .. कितीही टेकु लावले तरी.. कारण दिसण्यापलिकडे ते खुप अथांग असतं ना..पण चांदण्या असतात ना त्याच्यातच लपलेल्या..
पडायला-बिडायला लागलं ना तर सर्रर्रर्रर्रर्रळ 'अल्ट + कंट्रोल + डीलीट’ बडवायचं आणि फ़्रॉक मधली मुलगी व्हायच पटकन..’ :)
Sunderrrrrrrrrrrrr.......... :)
ReplyDeleteA pori :) kiti chandanya vechlyas ga tu ;-? khuuuuup sundar lihile aahes :) kalpana ekdam chan :)aajkal aaplya avatibhavati...kahi changla kam karaycha jhala ki karaychay ga...pan velach hoat nahi ...hich vakya aaiku yetat..kuthe chalaloy apan? MATRIX madhlya eka krutrim jagat jagnyacha fuka abhiman balagto ani dusaryannahi dakhavto...pan ya kharya chandanya pahnyasathi..vechnyasathi thodassa thambu..ani Medha sarkhi Frock madhli mulagi hou :)
ReplyDeleteAvaneeshla bhoor gheun jatana tyala pratyek goshtiche kutuhal asate..me ghaait asate ani tyala pan pudhe odhat asate...manat pudhe thaklelya kamancha dongar ubha asato...pan laggech mala janiv hote...yala he jamte tar thambu thoda vel...malahi tyachya drushtitlya chandanya tipta yetil :)
2 varshancha Avaneesh kay ani 85 varshanchi panaji aajji doghahi sarkhech hotat mag...doghankade khuuuuuup savad asate chandanya tipaychi..mag hote tyannach join ani bharun ghete majhyahi frock cha ocha :D
ti anubhuti tu itaki chan mandali aahes tyabaddal khup khup dhans :D
-Prajakta
khup sundar, ek chandani milayasarkhe vatale.
ReplyDeleteछान लिहिता तुम्ही..
ReplyDeleteमराठी भाषेत लिखान करताना वाक्य संपल्यावर पुर्न विराम(.......................) असा मनाला वाटेल तेव्हढे डॉट्स देन्याचे केव्हा सुरु झाले ? मी मराठी मिडीयम मधुन दहावी ७२% गुण घेवुन १९८० पास झालो आहे. पहिली ते दहावी पुर्न विराम फक्त(.) एकच टीकली असा होता. असा बदल फक्त मराठीतच झालाय की English मधे पन झाला आहे? हे चिन्ह पुर्न विराम आहे अर्ध विराम आहे की स्वल्प विराम आहे की उद्गार वाचक आहे की ही रांगोळी आहे कृपया कळवने. र्हस्व दीर्घ, न आणि ण मधे माझे ही चुकते कारण शाळा सुटुन ३० वर्ष झालीत.
ReplyDeletefaar chaan lihtes tu ...
ReplyDelete’अरे वेड्या .. आभाळ-बिभाळ पडत नसतं काही कधीच.. आणि खरचं पडलंच तर मज्जाच असते. चमचम चांदण्या वेचता येतात..’
faar aawadala lekh ...
aattaparyantachya lekhamadhyae saglyat jast aavadlela lekh...mastach!!ekdam dolyasamor chitra disayla lagte vachalyavar...GREAT!!
ReplyDeletehey....
ReplyDeletekhup ushira comment post kartey me...
pan kharach, khup chhan watla...
ayushyatlya hya chandanyach tar astat jya padnarya abhlala ani andhrala tolun dhartat...!!
thank you sony taai...
tc..
Thank's junya athvani parat tajya kelya badal.
ReplyDeletedolyatun pani aley karan shaletil te divas parat yanar nahit naa.... man gahivarun ale.
puna ekda thank you
avinash mestry, mithbav, sindhudurga
खूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteअशाच चांदण्या वेचत रहा आणि मधाचे बोट लावत रहा.