Friday, 30 April 2010

एका भाळल्या क्षणी ..

 माझी जिवश्च-कठश्च सखी प्राजक्ताच्या पहिला पाऊस चे हे स्वैर रुपांतर ..

याही वेळी तो हलकेच आला.
पाऊल न वाजवता..
खट्टू होवून त्याला म्हटले
"हा रे कसला छळ?"
मातीचा उत्कट गंध श्वासात भरत
जरा रागातच दटावलं त्याला..
"न सांगता बरसलासच कशाला?
ते काही नाही आत्ताच्या आत्ता परत बरसायचं!"

ढगातल्या गालात हसत तो म्हणाला..
"अग आत्ताच तर बरसून गेलोय ना.
पूढच्या वेळी नक्की जागी रहा बरं..
आणि अशी रडत नको राहूस वेडुबाईसारखं..
ठेवून जातो आहे ना तुझ्यासाठी
गारव्याचा स्पर्श.."

रडत नव्हते मी मुळीचच
पाना-फ़ुलांची बेभान नव्हाळी न्याहाळत.
थेबांचे सोनेरी मोती संभाळत..
ठेवली थोडीशी सोनचाफ़्याची फ़ुले खिडकीशी.
मिसळले त्यात मनाचे सूर बेमालूमपणे...
हलकेच शिंपडला जुन्या भेटींचा रंग त्यावर
आणि ’डुयटी मस्ट रे बाबा’ म्हणत लागले नेहेमीच्या व्यापाला
 त्याच्याच नकळत त्याचा मागोवा मात्र घेत..
’खरचं भूलेल का तो या गंमत कारस्थानाला ?’

आणि एका भाळल्या क्षणी ..
भासच वाटावा असा खासच आला की तो पुर्नभेटीला.. :)


7 comments:

  1. khup chan kavayitribai :)
    kasa kalala ho tumhala me lihilela akshar an akshar ;-?

    ReplyDelete
  2. मस्त परफ़ेक्ट लिहील आहेस. आपण भारतात जाणार त्यानंतर थोडेच दिवसांमधे असा खुप छान पाउस येणार. :-) त्यात चिंब भिजायला काय मजा येइल. :-)

    ReplyDelete
  3. Rain must come with thunders and showers, he must make aware to all that u all were waiting for me, I am here to play with u, gossip with u, and to give u rememberance of many moments, those were kept in safe deposit vault of mind!
    Nice poem and superb presentation!!

    ReplyDelete
  4. @लेलेकाका,blog वर आपले हार्दीक स्वागत..आणि प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
    मलाही असा आवेगाने येणारा ,असोशीने वाट पाहणार्‍या तृषार्त मनाला ओलेचिंब भिजवणारा पाऊस आवडतो.. खरे तर त्याची सगळी रुपे स्वत:मधे गंमत कविताच असतात... कसाही बरसला तरी वेगळेच छान वाटते.. मनातले काहीच लपून राहत नाही आणि मग आनंदाचे असंख्य झरे पाझरु लागतात ...:)

    @मैथिली , तुझे पण हार्दीक स्वागत..आणि प्रतिक्रियेसाठी धन्स ग.. :)

    ReplyDelete
  5. Mast lihilis :)

    ha haat aishwryaachach na g?

    ReplyDelete
  6. @दीप..blog वर मनापासून स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी धन्स..
    आणि हो ..तो हात ऐश्वर्याचाच.. ’ताल से ताल मिला..’ मधला:)

    ReplyDelete