आपल्याच विचारांच्या गुंत्याने आपण आपली आयुष्ये गुंतागुंतीची करत असतो. आयुष्याचा खरोखरीचा अर्थ ज्यांना कळला आहे अश्या थोरामोठ्यांच्या आय़ुष्यात थोडे डोकावले की मात्र साध्या साध्या गोष्टींमधले त्यानी शोधलेले सुंदर अर्थ त्यांच्या जीवन रसरसून जगण्याचे रहस्य सांगुन जातात. मोठी माणसे मोठी का असतात ..त्यांचे मोठेपण साध्या सोप्या विचांरांमधे दडलेले असते. कुठल्याही गोष्टी कडे पाहण्याची त्यांची अनोखी द्रुष्टी मनाला खूप वेळा नवा विचार, उभारी देवुन जातात.
बरेच दिवासांपासुन मनात होते अश्या सुंदर गोष्टींचा एक संग्रह आपाल्यापाशी असावा.मनाच्या परिस स्पर्शाच्या या गोष्टी मग पडत्या-झडत्या,भांबावलेल्या प्रत्येक क्षणी आडोसा बनुन जगण्याची उर्मी पुनश्च तरारुन यावी..
आज अश्याच एका सुंदर गोष्टीने सुरुवात करते...
काल youtube वर शोधता शोधता अचानक ही लिंक मिळाली.
हे प्रा. प्रवीण दवणे यांचे ’काव्यांजली - ऒड वाटेच्या काविता’ या कार्यक्रमामधले भाषण आहे. त्यात त्यांनी सांगितलेला हा किस्सा.
ते एकदा कविवर्य कुसुमाग्रजांना एका कुठल्याश्या कार्याक्रमामधे भेटले..आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला..
’तात्यासाहेब् आजकाल कितीजण कविता करतात. कोणीही उठावे आणि कविता करावे असे चित्र आहे.’
त्यावर ते म्हणाले...
’सकाळी नांगर हातामधे धरणारा शेतकरी जर संध्याकाळी लेखणी हातात धरुन कविता करत असेल तर तो कदाचित चांगला कवी नसेल पण चांगला माणूस तर असेल.’
कित्ती सहज आणि सोप्या शब्दात त्यांनी कविता आणि चांगला माणूस असण्याचे मर्म सांगुन टाकले. आपल्या स्रुजनाच्या ताकादीची जाणीव असणारे काही लोक सोडले तर बाकी आपण सगळेच,’कशाला काही लिहायचे... कोण वाचणार..’ , ’थोरा मोठ्यानी लिहुन ठेवलेय तेच वाचावे आणि गुमान बसावे’ अश्या प्रश्न्नानी, विचारांनी ग्रासलेले असतो. रोजच्या जगण्यातल्या कुठल्यातरी अत्रुप्त स्वप्नाच्या छायेमधे हीनगंड बाळगु लागतो. कित्तेक वेळा सुप्त मनात असलेली ही गोष्ट तुमच्या मनातली कविता कागदावर उतारु देत नाही... पण मला वाटते वरची गोष्ट नक्कीच या उगीचच्या जडत्वावरचे झाकोळ दूर करेल आणि ’एक चांगला माणूस’ होण्यासाठी मनाची कवाडे स्रुजनाच्या दिशेने उघडी करेल..
ता.क: प्रा. प्रवीण दवणे यांचे संपूर्ण भाषण खूपच सुंदर आहे हे सांगणे न लागे. :)
Monday, 12 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
hey, ekdam yogya naav diles...'paris
ReplyDeletesparsha :)'ha paris far mothach asla pahije ase nahi...durmil asava asehi nahi...fakta aaplya aaspas asnare asankhya chote chote paris manala sparsha kartil itake aaple maan srujanshil asave :)..tujha ha khajina asach bhar bharun vaho :)
-Prajakta
मेधाबाई : तुम्ही छान लिहिता, पण लेखनशुद्धतेकडे लक्ष द्या.
ReplyDelete'माणुस', 'खुप', 'रसरसुन' हे शब्द फार खटकतात. मीच हे म्हणतो आहे असे नाही, इतरांनाही ते खटकतीलच. तुमचे सगळेच उ-कार र्हस्व आहेत, आणि त्यातले बहुतांश चूक आहेत.
विशेषणांची खैरातही टाळा. कुसुमाग्रज भले खूप थोर असतील, पण ते 'आद्यकवी' नव्हते.
आणि तुमचा ब्लॉग 'marathiblogs.net' ला ज़ोडा. त्याच्यासाठी कोणाशी कसा सम्पर्क साधावा लागतो याची मात्र मला माहिती नाही.
khup chan....sahaj rikami basle hote manat mhatle medhane navin kay lihiley barech divsat baghitle nahiy baghave tari ....ani ha paris sparsh zzala...ata mi rikami nahi rahile. kahi kam nasel tar lihine ahech na sahaj sope sundar...
ReplyDeleteप्राज आणि पल्लवी प्रतिक्रियेबद्दल खूप सारे धन्स :) आता तुमच्या दोघींच्याही blogs वर posts चा पाउस पडो..
ReplyDeleteनानिवाडेकरजी, (आडनाव चुकले असल्यास माफ़ी असावी बरं) blog वर आपले मनापासून स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी खूप सारे धन्यवाद.
लेखनशुद्धतेविषयीच्या सूचनांसाठीही आपले आभार.. मी आधी gmail चा mail editor आणि quillpad वापरत होते .. त्यामधे फ़ारसे पर्याय उपलब्ध नव्ह्ते..पण हल्लीच बरहा install केला आहे.. आणि शुद्धलेखनाची नक्की काळ्जी घॆईन.. तुर्तास हे पोस्ट दुरुस्त केले आहे.. मागच्या पोस्टस वरही लवकरच काम करेन...’आद्यकवी’ वाली चूक मात्र अनावधानाने झाली..
khara aahe Medha!kunala kavita karayla jamelach ase nahi pan tyatla aanand jari gheta aala tarite "changala manus" banayla khup madat karate.. yatun apan aplya jivanavarchi shhraddha drudh karat asato aani ashi shraddhach aplyala jeevan asoshine jagayche bal det asate..Lata Katdare che aanandyatra sangopanachi,Pravin Davane yancha Chaitra JEEvanche ha lekh vaach ..tyat suddha he khup chhan sangitale aahe..ase kahi kisse ,lekh aaplya kade jamavun parat parat vachayla khup chhan vatate...mazyakade ata tuzya aani pallavichya blogmule khup bhar padat aahe..share karayla khup aahe pan kharach vel deu shakat nahiye...punha nakki karen
ReplyDeleteTuzhya lihinyachi khup vat baghatoy amhi sagalech Sayu :) lavakr Shuru ho ja..
ReplyDeleteTu sangitalele lekh avarjun vachate ..